जिओने पैसे आकारल्यानंतर आता ही कंपनी देणार मोफत कॉलिंग

0

पुणे: जिओ कंपनीने आऊटगोईंग कॉल वर चार्ज आकारण्याची घोषणा करत जिओ ग्राहकांना धक्का दिलाय. जिओ ने त्यांची कॉलिंग पॉलिसी बदलली असून आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. तर जिओच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या एका कंपनीने त्यांच्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल फ्री देण्याची घोषणा करत दिवाळीच गिफ्ट दिल आहे.गुरुवारी वोडाफोन आयडीआय कडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेत त्यांनी म्हटलंय कि ‘व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल’ असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे. जिओ ने मोफत कॅलिंग सेवा देऊ केल्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या आईडीया, वोडाफोन, एअरटेल या कंपन्यांना ट्राय च्या नियमानुसार १३ हजार ५०० कोटींची भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता ट्रायच्या नियमांपासून बचाव करण्यासाठी जिओने आउटगोइंग कॅल वर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.जिओच्या ग्राहकांना धक्कादरम्यान व्होडाफोन ने आयडिया विकत विकत घेतल्यानंतर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या अहवालानुसार व्होडाफोन आयडियाने जुलै-ऑगस्टमध्ये जिओपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत Vodafone Idea चे 38 कोटी अ‍ॅक्टिव्ह ग्राहक बनले आहेत. तर जिओचे 33.4 कोटी युजर्स आहेत. भारती एअरटेलकडे 32.9 कोटी युजर्स आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.