राज्यात प्रथमच प्लास्टिक बँकेची स्थापना

0
भडगाव नगरपालिकेचा अनोखा उपक्रम                                                                         भडगाव (प्रतिनिधी) :  येथील नगरपरीषदेने शहरात प्लास्टीक बंदी करण्याच्या करण्याच्यादृष्टीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेत प्लास्टीक बॅंकेची स्थापना स्थापना करण्यात आली असुन 'एक पिशवी भरून प्लास्टीक आणा अन् एक कापडी पिशवी घेऊन जा' अशी मोहीम हाती घेतली आहे. या प्लास्टीक बॅकेला शहरातुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यात अशा पध्दतीने प्लास्टीक बॅंकेची पहील्यांदाच स्थापना झाली आहे.  देशात प्लास्टीक वापरावर बंदि आणण्यात आली आहे. त्यादृष्टीने भडगाव नगरपरीषदेने प्लास्टीक बॅकेची स्थापना करून अभिनव पध्दतीने प्लास्टीक बंदिची मोहीम हाती घेतली आहे. कदाचित राज्य अशा प्रकारची पहील्यांदाच बॅंकेची स्थापना करण्यात आली आहे. प्लास्टीक बंदिच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  प्लाॅस्टीक आणा अन्..... शहरात नगरपरीषदेच्या वतीने प्लास्टीक बंदिची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टीक चा वापर करणार्या दुकानदारावर नगरपरीषदेच्या पथकाने दंडात्मक कारवाई ही केली. याशिवाय प्लास्टीक चा वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली आहे. याबरोबरच  प्लास्टीक बंदिची मोहीम अधिक बळकट व्हावी यादृष्टीने मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतुन नगरपरीषद कार्यालयात प्लास्टीक बॅकेची स्थापना करण्यात आली आहे. नागरीकांनी एक पिशवी भरून प्लास्टीक या बॅकेत जमा करायचे आहे आणि त्या बदल्यात त्यांना नगरपरीषदेकडुन चांगल्या दर्जाची कापडी पिशवी भेट म्हणुन दिली जाणार आहे. या बॅकेला शहरवासीयांकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते नुकतेच या बॅकेचे उटघाटन करण्यात आले.  दरम्यान  प्लास्टीक बॅकेंबरोबरच नगरपरीषदेच्या वतीने शहरातील शाळांमधे 'प्लास्टीक जमवा अन् बक्षिस जिंका'ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील बहुतांश शाळांनी सहभाग नोंदवला. त्यातुन विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरातील प्लास्टीक गोळा करून शाळेत आणले. काही विद्यार्थ्यांना तर रस्त्यावरील प्लास्टीक ही जमा करून आणले. यातुन मोठ्याप्रमाणत प्लास्टीक चे संकलन झाले. या स्पर्धेच्या माध्यमाने प्लास्टीक चा वापर विद्यार्थ्यांनी करू नये आणि घरी ही त्याचा वापर करू नये असा उद्देश होता. एवढेच नाही तर काही शांळामधे पालिकेच्या वतीने कापडी पिशव्यांचे ही वाटप करण्यात आले. शहरात नगरपरीषदेच प्लास्टीक वापरावर करडी नजर असल्याने सार्वजनिक कार्यक्रममधे जेवनावळीच्या ठीकाणी पत्रावळ्याऐवजी केळीचे पाने दिसायला लागले आहेत.                                                       प्लास्टीक बॅकेंच्या माध्यमाने प्लास्टीक जमा करणार्याना नगरपरीषदेच्या वतीने कापडी पिशवी भेट देत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद आहे. पुढच्या टप्प्यात ही बॅक घरोघरी घेऊन जाण्यावर आमचा भर आहे. शहर प्लास्टीक मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे.  - विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरीषद भडगाव

Leave A Reply

Your email address will not be published.