कृउबासचे माजी सभापती किशोर पाटील शिवसेनेत

0

गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुक्यात प्रचाराचा झंझावात धरणगाव, प्रतिनिधी तालुक्यातील गारखेडा येथील माजी सरपंच किशोर पाटील व त्यांचे समर्थकांनी आज गारखेडा येथे ना.गुलाबराव पाटील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गुलाबराव पाटील यांची प्रचार रॅली गारखेडा येथे गेली असता हा प्रवेश सोहळा उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. धरणगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांची लाट निर्माण झाली असून प्रत्येक मतदार हा कार्यकर्ता म्हणून गुलाबभाऊंचे काम करतांना दिसत आहे. गेल्या तीन दशकांपासून गुलाबराव पाटील यांची मतदान संघातील आबालवृद्धांशी एक अतूट नाते निर्माण झाले आहे प्रत्येकाला गुलाब भाऊ आपले वाटतात यातच सर्व काही आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक थेट गुलाबभाऊंच्या संपर्कात असून सार्वजनिक असो की वैयक्तिक काम असो भाऊ प्रत्येकाच्या मदतीला धावून आले आहेत. सामान्यांचा सर्वसामान्य आमदार अशीच भाऊंची ओळख मतदारसंघात आहे. त्यांच्या या प्रतिमेमुळेच भाऊ ज्या गावात, गल्लीत आणि घरात जात आहे तेथे भाऊंचे उस्फूर्तपणे स्वागत केले जात आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रतिसादाने सारे वातावरण भगवामय झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.