जारगांवात इलेक्ट्रिक गोडावूनला आग, 10 लाखाचे नुकसान

0

पाचोरा, दि.20 –
पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या जारगांव येथील नुरानीनगर भागातील इलेक्ट्रिकल गोडावूनला शॉक सर्किटमुळे अचानक आग लागल्याने त्यात फ्रिज, कुलरसह इलेक्ट्रॉनिक वस्तु जळुन खाक झाले असून आगीत सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची तिव्रता आतिशय भयानक असल्याने पाचोरा येथील दोन व भडगांवच्या एक अशा तीन अग्नीशमन दलाला आग विझविण्यासाठी दोन तास लागले. जवळ व आजुबाजुला घरे आहेत मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. शहरातील आक्सानगर परीसरातील रहिवासी आशिफ देशमुख यांचे जारगाव शिवारात इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे गोडाऊन आहे. व सोनी इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान हे बस स्टॅडरोडवर आहे. त्यांचे जारगांव येथील गोडावूनला सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली आगीत गोडावूनमधील फ्रिज, कुलर व कुलरचे पार्ट जळुन खाक झाले. त्यात सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.