जामनेर पोलीसांवर जुगारांची दगडफेक ; २ अधिका-यांच्या ४ कर्मचारी जखमी

0

 जामनेर | प्रतिनिधी 

येथील भुसावळ रोड वरील इंदिरा आवास भागात दि.७ अक्षय तृतीयाच्या रात्री सुमारे ११-३० वाजेच्या सुमारास जुगार खेळणाऱ्या जमावाने अचानक पोलीसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील,हेड कॉन्स्टेबल सुभाष माळी,सुनिल राठोड,किशोर परदेशी,जगदीश गोसावी आदि जखमी झाले असून जखमीवर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश प्रभाकर नानोटे,निलेश प्रभाकर नानोटे,राहुल माळी यांच्यासह ८ ते १० जणांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम ३५३,३३२,३३३,११४, १४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.यातील सर्व आरोपी फरार झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे स्वतंत्र २ पथक तयार करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.