रेल्वे स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0

भुसावळ | प्रतिनिधी
सीबीएससी दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागला असून त्यात भुसावळ येथील रेल्वे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.यात दहावी मध्ये १३ विद्यार्थ्यांना ९० टक्‍के पेक्षा जास्त गुण मिळाले. दहावीच्या गुणवंत विद्यार्थी या प्रमाणे काशीश यादव प्रथम ९४.०८,द्वितीय आदित्य चव्हाण ९३.०८,तृतीय हर्ष बतुलवार ९३.०३ तसेच ९० टक्के पेक्षा जास्त गुण पुढील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. सुमय्या अन्सारी,मोहसीन गवळी,राज चव्हाण,सेजल जगताप, अभिरभव चौधुरी,शुभम साहू , शलेंद्र सिंग,चित्राक्षी कापगते, अरुण राजपूत,आर्चित श्रीवास्तव,तसेच बारावी विज्ञान शाखेतून प्रथम दीपिका सिंग, द्वितीय आदिती पांडे तृतीय मोहित सिंग चाहर तर वाणिज्य शाखेत वैष्णवी परदेशी प्रथम, स्नेहल निर्मल द्वितीय आणि विवेक सैनी तृतीय आले.डिआरएम विवेक कुमार गुप्ता,एडिआरएम मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक आणि प्रभारी प्राचार्य सतीश कुलकर्णी  यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.