”बियाणी ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सने” घडविले सामाजिक बांधिलकीचे दर्शन ; कौतुकास्पद कार्य

0

भुसावळ  | प्रतिनिधी
जॉब फेअर फेस्टिवल मध्ये आलेल्या तरुणासह आईला सुद्धा जॉब देऊन अत्यंत मोलाचा आधार येथील बियाणी गृपने दिल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . . ४ व ५ मे  २०१९ रोजी जळगाव येथे झालेल्या जॉब फेअर फेस्टिवल २०१९ दरम्यान, बियाणी ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी ,सचिव सौ. संगीता बियाणी,व राजेश  पारिख आदी  जॉब करीता मुलाखती घेत असतांना उमेदवारांशी चर्चे दरम्यान एक उमेदवार असा आढळला कि, ज्याच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले होते  आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक व बिकट  अशी आहे त्यात ६० वर्षीय आई  इतर कुणाचाही कोणताही आधार नाही घरावर  दुःखाचा डोंगर कोसळलेला .अशा या उमेदवाराची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी जाणुन घेतल्यानंतर सौ. संगीता बियाणी तसेच उपस्थितांना गहिवरुन आले. त्यांनी त्याचक्षणी त्या विद्यार्थ्याला नोकरी तर दिलीच पण त्याचबरोबर त्याच्या ६० वर्षीय आईसाठीसुद्धा वयोमान लक्षात घेऊन आवश्यकता नसताना देखील विशेष जागा (पद ) निर्माण करुन त्यांना देखील नोकरी दिली. एवढेच नव्हे तर त्या दोघांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या सुविधेचीही तरतुद केली. हि घटना ऐतिहासिक स्वरूपाची आणि इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे, स्तुत्य आहे. बियाणी ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स तसेच बियाणी प्रोजेक्टसने आजवर अनेक विधवा , परित्यक्ता,बेसहारा ,गरीब घटकांना नोकरीची,शिक्षणाची संधी देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे, स्वीकारत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.