जामनेर पोलीसांच्या सर्तकतेमुळे वाचले दोन जखमी इसमांचे प्राण

0

जामनेर | प्रतिनिधी
दि. 17 रोजी रात्री 3 वाजेचे सुमारास जामनेर ते बोदवड रोडवर भवानी घाटात एका बोलेरो गाडी क्र. एम.एच- 46/- एएफ- 0745 या गाडीचा अपघात झाला आहे अशी माहिती जामनेर पोलिस स्टेशच्या गस्तीवर असणार्याा वाहनाला मिळाल्याने गस्तीवर असलेले पोहेकॉ सुभाष माळी, शिवाजी पाटील, पोना सुनिल राठोड यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहनातील शेख रहीम रा. मुक्ताईनगर, शेख अलताफ जखमी अवस्थेत पडलेले असतांना सुभाष माळी यांनी पोनि प्रताप इंगळे यांना कळवून 108 ला फोन करून बोलावून जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
जखमीच्या नातेवाईकांना तात्काळ फोनवरून संपर्क साधला. जखमींना पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले पुढील उपचार सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.