जामनेर पं.स. सभापतीची आज निवड

0

जामनेर, प्रतिनिधी – पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज (२) गुरुवार रोजी निवडसभा बोलाविण्यात आली आहे.आगामी अडीच वर्षांसाठी ही निवड असली तरी या काळात दोघांना संधी मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.सभापती हे पद  अनुसुचीत जमातीसाठी राखीव असल्याने भाजपचे दोन सदस्य यासाठी पात्र आहेत,त्यात चिंचखेडा तवा येथील जलाल सुलेमान तडवी आणी महुखेडा येथील सुनंदाबाई  प्रल्हाद पाटील यांचा समावेश आहे.        त्यामुळे एकाला सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी दोघांना विभागुन देण्याच्या विचारात पक्षश्रेष्ठी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.भारतीय जनता पक्षाकडे एकुण चौदापैकी दहा पंचायत समितीसदस्य असल्याने सभापती निवड बिनवीरोध होण्याचिच जास्त शक्यता आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या पुजा भडांगे (पहुर) यांचे पती योगेश भडांगे यांनी चार महीण्यांपुर्वीच  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता,त्यामुळे त्यांच्या भुमीकेकडेही तालुकाभरातील राजकारण्यांचे लक्ष रहाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.