जामनेरात विनाकारणफिरणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसाद

0

जामनेर | प्रतिनिधी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण शहर लॉक डाऊन असतांना नागरिक पाहिजे त्याप्रमाणात सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला व किराणा दुकानांवर गर्दीचे प्रमाण वाढत असून किराणा दुकानांवावर नागरिक जास्त प्रमाणात जुंबड करतांना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मेनरोड,भुसावळ रोड नाका,जिजाऊ चौक, गांधी चौक, पाचोरा रोड, जळगांव रोड या भागात,चौका-चौकात नागरिक घोळका करून गप्पा मारतांना दिसत आहे. नागरिक कोरोना सारख्या महाभयंकर आश्या साथीच्या रोगाला गांभीर्याने घेतांना दिसत नाही. गर्दी होत असल्याने पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी मोटारसायकल धारकांना व मालवाहतूक करणाऱ्यांना प्रसाद दिला.त्यामुळे तरी काही प्रमाणात गर्दी कमी होण्यास मदत होईल असे वाटते. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी रास्त अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच परजिल्ल्यातून येणारे काही नागरिक स्वयं स्फुर्तीने जिल्हा उपरुग्णालयात येऊन तपासणी करून घेत आहे. तर काही तपासणी साठी येत नसल्याने समाश्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज जामनेर शहरात सर्वच मेडिकल उघडी असून त्यामुळे जनतेची सोय होत असली तरी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच शहरातील किराणा दुकान, धान्य दुकान रोज सकाळी 8 ते 12 या वेळात सुरू असणार आहे.तर दूध डेअरी सकाळी 8 ते 12 व संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत सुरू असनार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. व आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.