पाचोऱ्यात नाभिक समाज दुकानदार यांना मास्क वाटप

0

पाचोरा | प्रतिनिधी  

कोरोना विषाणू आजाराचे गंभीर संकट आपल्या देशावर आले असुन आपली १३७ कोटी लोकसंख्या असुन कमी लोकसंख्या असलेल्या व श्रीमंत देशांनी सुध्दा ह्या कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला हात टेकले आहे. म्हणुन हा भविष्याचा विषय असुन पाचोरा शहरातील सर्व नाभिक समाजातील  दुकानदार बाधवांना मास्क वाटप करण्यात आले. मास्क देण्याचे सहकार्य करणारे नाभिक समाजातील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन मास्क विकत घेऊन शिक्षकांनी कोरोना सारख्या आजारा पासुन सुरक्षित राहण्यासाठी उपाय योजना संगीतल्या. ह्या उपक्रमा साठी नरेश गर्गे, मनोहर सोनवणे, भगवान बिळकर, नितिन खोंडे, सुनील निकम, मधुकर महाले, दिलीप शिरसाठ, राजेन्द्र बोरसे सर तसेच  बारकु बाबुराव चित्ते (अमोल कॉस्मेटिक), मनोज भागवत वारुळे (ब्युटी पैलेस), विकास एकनाथ जाधव, योगेश पंढरीनाथ चित्ते, रविन्द्र पंढरीनाथ चित्ते, सुनील धर्मा चित्ते, रमेश भिका वारुळे, गजानन एकनाथ जाधव, साहेबराब लोटन सैदाणे , अशोक चित्ते, चिंतामन सीताराम जाधव, फकीरा भावडु शिरसाठ  ह्या दात्यानी मदत केली व  पितांबर नेरपगार, दिपक नेरपगार, प्रकाश मानकरे, राजेन्द्र जाधव, जगदीश सोनवणे, कैलास चित्ते, अजय जाधव यांनी परिक्षम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.