एरंडोल येथील पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित

0

एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल येथील साईनगर परिसरातील रहिवासी नामदेव देवराम महाजन हे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी असून देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अशी तक्रार तहसीलदार,जिल्हा उपनिबंधक, यांच्याकडे करण्यात आली आहे.
नामदेव महाजन यांनी देना बँक एरंडोल शाखेतून १२ जून २०१८ रोजी एक लाख ४६ हजार रुपये पिक कर्ज घेतले होते ते ३० सप्टेंबर २०१९अखेर थकबाकीदार आहेत. सदर कर्जाचा भरणा २५ ऑक्टोबर २० १९ रोजी त्यांनी केला असून ते महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेचे लाभधारक सभासद आहेत. त्यांचे नाव कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत टाकण्यात आले नाहीत. त्यांचे नाव रेगुलर मध्ये टाकले गेले आहे. ही चूक देना बँक एरंडोल शाखेने केलेली आहे. अशी त्यांची तक्रार आहे. त्यांनी त्याबाबत देना बँक एरंडोल शाखेला सुद्धा लेखी तक्रार केली आहे.
देना बँक देना बँकेने चूक लवकरात लवकर दुरुस्त करून मला कर्जमाफीचा लाभ द्यावा अन्यथा मी आमरण उपोषणास तहसील कार्यालयासमोर बसणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान देना बँक एरंडोल शाखेने नामदेव महाजन यांना याबाबत दिलेल्या लेखी पत्रात असे नमूद केले आहे की आपले खाते क्रमांक ०/९३/३०३१२७० दिनांक २६/०२/२०  कर्जमाफी पोर्टल वर अपलोड करण्यात आलेली आहे. व ते ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत होते. सदर चे खाते रेगुलर म्हणून अपलोड  केलेले नाही. व आमच्या लेव्हलला. आज रोजी काहीही पेंडिंग नाही. असे नमूद करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.