जामनेरात खाटीक समाजाचा आदर्श विवाह !

0

माजी मंत्री गिरीष महाजन यांची उपस्थिती

जामनेर( प्रतिनीधी) : शहरातील खाटीक समाजाचा साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. शहरातील जामनेर पुरा भागातील नगरसेवक बाबुराव हिवराळे यांच्या जेष्ठ कन्या माधुरी व कुऱ्हा काकोडा तालुका मुक्ताई नगर येथील संतोष गंगतिरे यांचे सुपुत्र अक्षय यांचा विवाह २ में रोजी ठरला होता. मात्र कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

वर आणि वधु या दोन्ही पक्षातील नातेवाईकांनी विचार करत लग्न साध्या पद्धतीने २९ जून रोजी करण्याचे ठरवले. त्यानुसार आज (२९ )जून रोजी शहरातील विशाल लॉन्स मंगल कार्यालयात सुरक्षिततेचे नियम पाळत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्यात आला.त्यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वधू वरास शुभ आशीर्वाद देऊन भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. लग्न समारंभात वर-वधू पक्षाकडील नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.