स्वाक्षरी अभियानातंर्गत कागदोपत्रे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना सुपूर्द

0

भुसावळ (प्रतिनिधी) : पोलीस प्रशिक्षण केंद्र सरकारने वरणगावातच ठेवावे यासाठी स्वाक्षरी अभियान वरणगावात भुसावळ शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आले होते.

नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले बॅनर व कागदपत्रे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना सुपूर्द करण्यात आले . यावेळी जळगाव जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील भुसावळ शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई व शिवसैनिक उपस्थित होते. प्रकल्प हलवू नये यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.