जाग्रुती अपंग संघटनेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बोधीसत्व, स्रीस्वातंत्य्राचे प्रणेते व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, गाढे अभ्यासक, दिन दलितांचे कैवारी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शहरातील एकलव्य नगरातील जिल्हा परिषद शाळेत जाग्रुती अपंग संघटने तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवट पर्यंत स्वप्न एकच होते. की माणसाने कर्माने शिकुन मोठे न होता. शिकुन मोठे व्हावे. शिक्षण हे वाघिणीचे दुध असते. व जो कोणी हे पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिका. संघटित व्हा. संघर्ष करा. हे ब्रीद वाक्य त्यांनी सार्थकी ठरविले. जगात स्रीस्वातंत्र्याची मुहूर्त मेढ प्रथम देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवली आपल्या बुद्धीच्यामतेच्या जोरावर त्यांनी कित्येक वर्षे चाललेली गुलामगिरी हाणुन पाडली. बुद्धीवंत बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहिली व शिल्पकार म्हणून त्यांनी नांव उंचीवर नेले. असा माहिती पट शाळेचे उपशिक्षक अनंत अरतकर यांनी उपस्थित विद्यार्थी यांना दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संघटनेच्या वतीने अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर व शिक्षक व्रुंद यांच्या हस्ते बाराखडी पुस्तक, वही, पेन व इतर साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी  गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, उपशिक्षिका तिलोत्तमा सनेर, अरुण बावस्कर, आशा सोनवणे, कल्पना बाविस्कर, अलियार खान, अन्वर पहिलवान, इम्रान खान, विलास खरात यांच्या सह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.