जळगाव विमानतळावर नाईट लॅंडींगला मंजुरी

0

जळगाव | प्रतिनिधी 

विमानतळावर विमानांचे “नाईट लॅंडींग’ व्हावे यासाठी गेले अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. त्याला केंद्रीय विमान वाहतूक संचनालय परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार गिरीश महाजभाऊ यांनी दिली. खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव विमानतळावर विमानांचे “नाईट लॅंडींग’ व्हावे यासाठी गेले अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. त्याला केंद्रीय विमान वाहतूक संचनालय परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी दिली. खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

जळगाव विमानतळावरून चोवीस तास विमान सेवा सुरू व्हावी यासाठी “नाईट लॅंडींग’ परवानगी देण्यात यावी यासाठी केंद्र शासनाच्या अख्यातरीत असलेल्या विमान वाहतूक संचनालय कडे मागणी करण्यात येत होती. त्याला यश आले असल्याची माहिती आमदार महाजन यांनी दिली. ते म्हणाले, की जिल्ह्याचे खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय विमानउड्डयन मंत्री यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या शिवाय आपणही त्याबाबत वेळोवेळी दिल्लीत त्याचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.

मंजुरीचे पत्र प्राप्त

विमान वाहतूक संचनालय आता मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र आज प्राप्त झाले आहे. देशभरातील 28 विमानतळात जळगाव विमानतळालाच “नाईट लॅंडीग’ची परवानी मिळाली आहे, शिर्डी विमानतळाला दिवसाची परवानगी मिळालीा आहे. असेही आमदार महाजन यांनी सांगितले.

पश्चिम क्षेत्रामध्ये असलेल्या 28 एअरपोर्ट पैकी जळगाव विमानतळ हे पहिले आरसीएस विमानतळ आहे त्याला नाईट लाइटिंग ची परांगी मिळाल्याने जळगाव चा मान राज्यात वाढलेला आहे.

विमानसेवा आता 24 तास

जळगाव विमानतळावर आता रात्रीही विमाने थांबू शकणार असल्याने जळगावातून आता चोवीस तास विमानसेवा उपलब्ध होणार असल्याचे आमदार महाजन यांनी सांगितले. लवकरच जळगाव येथून पुणे येथेही विमानसेवा सुरू होणार आहे.जळगाव विमानतळ नाईट लँडिंग सुविधा मिळावी याकरता सुमारे पाच कोटी रुपयात खर्च भारतीय विमान प्राधिकरणाने केलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.