अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

मुक्ताईनगर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने  मोटारसायकल वरील एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता  कर्की

गावालगत घडली. आकाश कैलास साबळे वय २० रा पिंप्री भोजना हा तरुण या अपघातात जागीच ठार झाला आहे.

एम एच १९ सीबी २२६८ या मोटरसायकल ने मयत आकाश कैलास साबळे, विकास कैलास साबळे दोघे रा. पिंप्री भोजना ता. मुक्ताईनगर सोबत त्यांची मावस बहीण नेहा बाळू वाघ  रा. करजोत ता. रावेर असे तिघे जण कर्की वरून करजोत ता. रावेर येथे जात असताना बेलसवाडी  कडून कर्की कडे जाणाऱ्या

विना क्रमांकाच्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ने मोटारसायकल ला समोरून जोरदार धडक दिली यात मोटारसायकल चालक आकाश कैलास साबळे हा जागीच ठार झाला तर विकास साबळे व नेहा वाघ हे जखमी झाले. अपघात घडताच  ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर चालक पसार झाला. या बाबत येथील पोलिसात

विकास कैलास साबळे यांच्या फिर्यादी वरून ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकोन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.