मंगल कार्यालयाची वास्तू तेली समाज एकजुटीचे प्रतीक – खा. उन्मेश दादा पाटील

0
 चाळीसगाव — तेली समाज उद्योगी असून सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेतो. तेली पंच मंडळाने पदरचा खर्च करीत समाजातील प्रत्येक घरातून   अभिनव पद्धतीने भांडवल उभे करून एक सर्व सोयीसुविधा युक्त मंगल कार्यालयाचे देखणी वास्तू उभी केली आहे. ही वास्तू तेली समाजाच्या संघटन शक्तीचे प्रतीक आहे अशी भावना पेट्रोलियम प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज तेली समाज मंगल कार्यालयात समाज भूषण कै. मधू अण्णा चौधरी यांचे पुतणे , बाळासाहेब उखा चौधरी याचे चिरंजीव राजाभैय्या यांच्या लग्नाच्या निमित्ताने आज त्यांनी तेली समाज मंगल कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी तेली समाज अध्यक्ष दिलीप दादा चौधरी, सदानंद चौधरी,योगेशदादा चौधरी ,पंडित अण्णा चौधरी,सचिव बापू पवार गुरुजी यांनी मंगल कार्यालयाच्या नूतन वास्तूबद्दल माहिती दिली. यावेळी मोठया प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.खासदार उन्मेश दादा यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधतांना ते म्हणाले की एक एकरपेक्षा अधिक जागेत ही वास्तू उभी राहिली आहे. जागा खरेदी साठी तत्कालीन एकवीस सदस्यांनी सात लाखाचे योगदान दिले आहे ही बाब भूषणावह आहेसमाज बांधवांकडून बांधकामासाठी एक कोटी दहा लाखाचा उभारलेला निधी तसेच पंचेचाळीस लाखांचा रोख निधी झाला ही गोष्ट इतर सामाजिक क्षेत्रात अनुकरणीय आहे. वास्तूचे देखणे पण पाहता तेली पंच मंडळ येत्या काळात सर्वात श्रीमंत ट्रस्ट ठरेल असे ते म्हणाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष, माजी अध्यक्ष स्व. मधू अण्णा चौधरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खासदार उन्मेश दादा यांनी मंगल कार्यालयाची पाहणी केली त्याचे सोबत पद्माकर दादा पाटील,माजी पस सदस्य दिनेश बोरसे,नरेंद्र काका जैन, रवी आबा पाटील ,विनायक वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.