जळगाव रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांकडून दीड लाख रुपये दंड वसूल

0

भुसावळ (प्रतिनिधी) विभागातील जळगाव स्थानकावर आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी वरीष्ठ व्यवस्थापक आर के शर्मा आणि भुसावळ विभागाचे सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक श्री अजय कुमार (टी. जा) यांच्या मार्गदर्शनाखाली विनातिकीट प्रवासी तपासणी मोहीम राबविण्यात आली जळगाव स्थानकात या तिकिट २00 प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. या प्रवाशांकडून दंड म्हणून एकूण 1,50,830 रुपये वसूल करण्यात आले. या मोहिमेमध्ये, तिकिटाविना प्रवास केल्याच्या 37 प्रकरणांना 26,990 रुपये दंड आणि अनियमित प्रवास करणार्‍यांना 233 रुपये 1,23,840 रूपये दंड आकारण्यात आला. या मोहिमेमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वतीने पथक (मुख्य तिकिट निरीक्षक तपासणी) यांच्यासह एटीएस पथक, फिर्यादी पथक, आयसीपी चेकस्, सजंग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.