रोकडे तांडा येथे घरफोडी,दीड लाखांचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील रोकडे तांडा येथे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख 46 हजाराचा ऐवज लंपास झाल्याची घटना काल रात्री घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,रोकडे तांडा येथील रहिवासी ममराज दलू जाधव वय (६७ ) हे काल कामानिमित्त बाहेरगावी गेले असता , त्यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून , गोदरेज कपाटातील एक लाख रुपये रोख, व पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे मनी मंगळसूत्र ,व बारा हजार रुपयाचे 4 ग्रम ची पोत ,दहाहजार रुपये किमतीचा चांदीचा बेला, नऊ हजार रुपये किमतीच्या चांदीचे दागिने असे एकूण १लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.