जळगाव : ‘त्या’ आठ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव | प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून 8 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते.
औरंगाबाद येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या 8 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.