चिंताजनक ! महाराष्ट्रात 1574 कोरोना पॉझिटिव्ह, 110 जणांचा मृत्यू

0

मुंबई । देशात करोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई – पुण्यात  तर कोरोनाने कहर केला आहे. ही संख्या इतक्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मागील २४ तासात मुंबईत २१८ नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे मुंबईत आता ९९३ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली आहे.

तर देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूंचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1008 पर्यंत पोहोचली आहे. त्यातही पुण्यात 254, कोल्हापूर 37, अकोला 34 आणि नागपूरात 26 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार सध्या राज्याची संख्या 1574पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असून वेळीत नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे. अन्यथा हा आकडा कैक पटीने अधिक वाढू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.