Breaking News : जळगाव जिल्ह्यात मिनी विमान कोसळले; एकाचा मृत्यू (व्हिडीओ )

0
  • सातपुडा जंगलात विमान कोसळून पायलट ठार, एक जखमी

  • शिरपूरच्या स्कूल ऑफ एव्हिएशनचे शिकाऊ विमान

  • तांत्रिक बिघाडामुळे जंगलातील टेकडीला धडकून कोसळले

  • दुर्घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणारे दै. लोकशाहीचे प्रतिनिधी पत्रकार मिलिंद सोनवणे एकमेव पत्रकार
  • सातपुड्याच्या पायथ्याशी विमान कोसळल्यानंतर वर्डी शिवारातील तसेच आदिवासी तरुणांचे मदत कार्य कौतुकास्पद.
  • शिकाऊ विमानात बिघाड झाल्यामुळे सातपुडा जंगलातील टेकडीला धडकले आणि खाली कोसळले.
  • विमानात प्रशिक्षक पायलट आणि प्रशिक्षणार्थी महिला पायलट हे दोघेच होते.
  • शिकाऊ विमान टेकडीला धडकल्यानंतर त्याचे टुकडे -टुकडे झाले होते.
  • प्रशिक्षणार्थी जखमी महिला पायलटचा मृतदेह विमानात अडकला होता आणि त्या विव्हळत होत्या.
  • कोसळलेल्या विमानाचे तुकडे बाजूला करून जखमी पायलटला अलगद तरुणशंनी बाहेर काढले.
  • प्रशिक्षक पायलटचा जागीच मृत्यू झाला होता.
  • जखमी पायलट आंशिकाला पुढील उपचारासाठी शिरपूरहून विमानाने मुंबईला हलविण्यात आले

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ~ मिलिंद सोनवणे

वड्री, ता. चोपडा, जि.जळगाव येथे दुपारी 4.00 वाजेदरम्यान दुर्घटना झालेले विमान हे शिरपूर एव्हीएशनचे मिनी प्लेन आहे.

यात दोन व्यक्ती (पायलट) होते. एक पुरुष व एक महिला आहे. पुरुषाचे नाव नरूल अमीन असून त्यांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यु झाला आहे. तर महिलेचे नाव अंकिता गुजर असून ती जखमी आहे. तीला पुढील उपचारासाठी शिरपूर येथे हलविण्यात आले आहेत. अशी माहिती चोपड्याचे तहसिलदार अनिल गावीत यांनी दूरध्वनीवरून दिली आहेत .

https://www.facebook.com/lokshahilive/videos/376762340467493

शिरपूर येथील स्कूल ऑफ एव्हीएशनचे शिकाऊ विमान तालुक्यातील वर्डी गावापासून 8 कि.मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी जंगलात कोसळले. त्यात प्रशिक्षक पायलट नुरूल अमिन (वय 30) रा. आंध्रप्रदेश हा जागीच ठार तर प्रशिक्षणार्थी महिला पायलट आंशिका गुजर (वय 24) रा. बडवाणी (मध्यप्रदेश) ही गंभीर जखमी झाली. तिचेवर चोपडा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंदर पुढील उपचारासाठी विमानाने मुंबईला हलविण्यात आले आहे.
आज सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही विमान दुर्घटना झाली. चोपडा लगत असलेल्या शिरपूर येथील विमान ट्रेनिंग स्कूलच्या मैदानावरून या शिकाऊ विमानाने उड्डाण घेतले. विमानात प्रशिक्षक पायलट नुरूल अमीन आणि प्रशिक्षणार्थी महिला पायलट आंशिका गुजर हे दोघेच होते. विमानाने वर्डी परिसरात दोन घिरट्या घेतल्या. तेव्हाच वर्डी शेत शिवारातील ग्रामस्थांना हे विमान कोसळले असे वाटत होते. त्यानंतर उनपदेव आणि सुनपदेवच्या जंगलात सातपुड्यातील एका टेकडीला धडक देऊन ते विमान कोसळले.

विमान कोसळल्यानंतर त्या जंगलात असलेल्या आदिवासी तरुणांनी वर्डी शिवारातील ग्रामस्थांना ही माहिती दिली. तेव्ही वर्डी शिवारातील अनेक तरुण विमान दुर्घटना स्थळाकडे पायी धावून गेले. तेथे प्रशिक्षक पायलट नुरूल अमीन हे जागीच ठार झाले होते. तर प्रशिक्षणार्थी महिला पायलट आंशिका गुजर गंभीर जखमी अवस्थेत विमानात अडकली होती.

प्रथम जखमी आंशिका गुजरला विमानातून बाहेर काढले. त्यानंतर बांबूच्या साह्याने झोळीचे स्ट्रेचर बनवून पायी आठ कि.मी. अंतरावर असलेल्या वर्डी गावात आणले.

वर्डी गावात राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे डॉ. कांतीलालजी पाटील यांनी जिल्हा उपजिल्हा रूग्णालयातून ॲम्बुलन्स मागवून तयार ठेवली होती. जखमी आंशिका गुजरला ॲम्बुलन्समध्ये प्रथमोपचार डॉ. कांतीलालजी पाटील यांनी केले. तिला त्यांनी धीर दिला आणि 10 ते 15 मिनिटात ॲम्बुलन्स चोपडा उपजिल्हा रूग्णालयात पोहोचली. तेथे उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर आंशिकाला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले.

दरम्यान शिरपूरच्या शिकाऊ विमान संस्थेचे संचालक माजी मंत्री अमरिशभाई पटेल आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे उपजिल्हा रूग्णालयातून फोनवर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोलणे झाले. आंशिकाची प्रकृती ठिक असून तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याची सूचना केली.

दरम्यान चोपडा उपजिल्हा रूग्णालयात राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्य्ाात अरुणभाई गुजराथी, प्रवीण गुजराथी, रा.कॉ. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प.चे माजी सदस्य डिगंबर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आदींचा समावेश होता. शिरपूर येथील शिकाऊ विमान संस्थेचे प्रमुख राहुल धांडे आणि त्यांची टीम रूग्णालयात दाखल झाली होती. दुर्घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे, चोपड्याचे तहसीलदार गावीत घटनास्थळी पोहोचले

जखमी पायलट ला 8 कि.मी. पर्यंत पायी आणले
वर्डी शिवारात असलेल्या तरुणांना विमान कोसळल्याचे कळताच सुमारे 20-25 तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे विमानात अडकलेल्या महिला प्रशिक्षणार्थी पायलट आंशिका गुजरला जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने दोन बाबुंच्या साह्याने झोळी बनवली. त्या झोळीचे स्ट्रेचरमध्ये टाकून घटनास्थळी ते वर्डी गावापर्यंतच्ाा पायी 8 कि.मी. प्रवास करून तेथे ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले.
बाबूंच्या स्ट्रेचर झोळीमध्ये टाकून जखमीला खांद्यावर आणण्यात वर्डी शिवारातील सर्वश्री अविनाश धनगर, हर्षल धनगर, साई शिंदे, मंगेश धनगर, बंटी पाटील, मुकेश पाटील, गुंजन व लखन गुजर, सत्यपाल धनगर, माऊली धनगर, विक्की पाटील, सागर, विशाल, किरण बडगुजर, दिपक पाटील आदी तरुणांचा समावेश होता. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.