जळगाव जिल्ह्यात आणखी ५६ कोरोना बाधित रुग्ण आढळले, रुग्ण संख्या ११६५

0

जळगाव | प्रतिनिधी 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आज चिंता व्यक्त करणारी बाब म्हणजे ५६ रूग्ण कोवीड पॉझिटीव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात अत्यंत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस आकड्यांचा आलेख हा वाढतच आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आली आहेत. एकुण आकडा १ हजार १६५ झाला आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चिंता वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरात ४, भुसावळ १९, चोपडा ३, धरणगाव ९, यावल ५, जामनेर १३, रावेर १, पारोळा २ अशी पॉझिटीव्ह रूग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.