जळगाव जामोदमधील बालाजी नगर परिसर पूर्णपणे सील

0

खामगाव : जळगाव जामोद मधील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने तो राहात असलेला बालाजी नगर परिसर हा पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती ‘मीळाली आहे.

जळगाव जामोद येथील दोन भाऊ हे बऱ्हाणपूर येथे एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी 6 मे रोजी गेले होते.  त्यानंतर ते जळगाव जामोदला परत आले. जो व्यक्ती वारला होता त्याचा भाचा दुसऱ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, या जळगाव जामोद परत असलेल्या दोन व्यक्तींना 9 मे रोजी खामगाव येथे हॉस्पिटल क्वारन्टीनसाठी पाठविण्यात आले.

10 मे रोजी त्यांच्या स्वॅबचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर आज 11 मे रोजी सकाळी त्यातील एका व्यक्तीचा नमुना हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान जळगाव जामोदचा बालाजी नगर परिसर सील करण्यात आला असून, त्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांचा शोध घेणे आता सुरू आहे. कोरोना पॉझिटिव व्यक्तीवर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.