अमळनेरकरानो अजून तीन दिवस जनता कर्फ्यु स्वयंस्फूर्तीने पाळा ; आ.अनिल पाटील

0

अमळनेर (प्रतिनिधी) –कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी अमळनेरकरानी दि 7 मे पासून संपूर्ण पाच दिवस घरात थांबून जनता कर्फ्यु 100 टक्के यशस्वी केल्याने कोरोना संपर्काची चेन ब्रेक करण्यात बऱ्यापैकी यश आलेले आहे,मात्र अजूनही ही चेन पूर्णपणे ब्रेक झालेली नसल्याची शक्यता आहे,यामुळे प्रशासनातील अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी व डॉक्टर्स यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या निरीक्षणानुसार अजून तीन दिवस याच पद्धतीने उद्या दि 12 ते 14 मे पर्यंत जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युस प्रतिसाद द्यावा असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.

आ.अनिल पाटील यांनी  दि 7 मे पासून पाच दिवस जनता कर्फ्यु चे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी यास स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत घरातच थांबणे पसंद केले.यादरम्यान किराणा भाजीपाला व मेडिकल दुकाने देखील बंद राहिल्याने कोणीही रस्त्यावर दिसून आले नाही. यामुळे  जनता कर्फ्यु 100टक्के यशस्ची झाला.या कर्फ्युची मुदत काल 11 मे रोजी संपल्याने पुढे अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू होणार का याबाबत नागरिकांत संभ्रम होता.यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी प्राशसन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या कर्फ्यु चा चेन ब्रेक करण्यात मोठा फायदा झाल्याचे सांगितले. मात्र याच पद्धतीने अजून तीन दिवस हा कर्फ्यु पाळला गेल्यास ही चेन पूर्णपणे ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केल्याने जनता कर्फ्यु दि 12 पासून पुढे अजून तीन दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात आ पाटील म्हणाले की पाच दिवस नागरिकांनी जो संयम ठेऊन प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद आहे.तसाच प्रतिसाद अजून तीन दिवस दिल्यास निश्चितपणे ते आपल्या आणि शहराच्या हिताचे राहणार आहे,त्यासाठी अजून थोडा त्रास सहन करा लवकरच आपल्या भूमीला पूर्वीप्रमाणेच सुगीचे आणि आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.हा जनता कर्फ्यु आपल्यावर कुणीही लादत् नसून तो आपण आपल्यासाठीच स्वयंस्फूर्तीने पळणार आहोत.यादरम्यान अत्यावश्यक सेवा देखील बंदच ठेवाव्या लागतील यासाठी संबंधित व्यावसायिकांनी देखील सहकार्य करावे.,कुणीही पुढील तीन दिवस घराबाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.