जळगावात 11 पासून तीन दिवस तज्ञांच्या मार्गदर्शनाची मेजवानी!

0

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, बांभोरी येथे फिस्ट व्याख्यानमालेचे आयोजन
जळगाव, दि.9 –
येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, बांभोरी येथे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील 11 ते 13 जानेवारी दरम्यान फिस्ट व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात देशभरातील दिग्गज मान्यवरांचे विचार आणि मार्गदर्शन मिळवण्याची संधी जळगावकरांना मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस.वाणी यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
पत्रकारपरिषदेला डॉ.एस.पी.शेखावत, डॉ.एस.बी.पवार, एस.आर.गिरासे, प्रा.कृष्णा श्रीवास्तव, समन्वयक प्रा.मुजताहिद अन्सारी उपस्थित होते.
श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात आयोजित या व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असते. यावर्षी दि.11 रोजी सकाळी 10.30 वाजता भारताचे विख्यात जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ते रिव्हर रिजूनिवेशन इन इंडिया या विषयी मार्गदर्शन करतील. त्यानंतर माझे यश माझ्या हाती याविषयी उद्योजक जयसिंग चव्हाण, दुपारी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी ऑफ इंडियन बर्डस अँड ऍनिमल्स या विषयाकडे करियर म्हणून कसे पाहता येईल याविषयी वन्यजीव छायाचित्रकार विनोद (बैजू)पाटील हे मार्गदर्शन करतील. दि.12 रोजी सकाळी 11 वाजता प्रथितयश अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर हे नोटबंदी नंतरचा भारत याविषयावर तसेच दुपारी महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन या परसुईंग युअर गोल यावर प्रेरणादायी व्याख्यान करणार आहे. शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात रिलायन्स जिओचे सहउपाध्यक्ष डॉ.मुनीर सय्यद हे इंटरप्रेन्युरशिप अपॉर्च्युनिटीज इन नेक्स्ट जनरेशन नेटवर्क या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्यानमालेचे हे सहावे वर्ष असून यावर्षी व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.