युसूफ पठाण डोपिंग चाचणीत दोषी

0

नवी दिल्ली :

टीम इंडियात पुनरागमन करू पाहणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला जबरदस्त झटका बसला आहे. युसूफ डोपिंग चाचणीत दोषी आढळला असून त्याच्यावर बीसीसीआयने पाच महिन्यांची बंदी घातली आहे.

१६ मार्च २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या टी-२० सामन्यात युसूफ पठाण खेळला होता. या सामन्यानंतर बीसीसीआयने अँटी डोपिंग टेस्ट प्रोगाम अंतर्गत युसूफच्या युरीनचे सँम्पल चाचणीसाठी घेतले होते. त्यात एक प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. टर्बुटलाइन वाडाच्या बंदी घातलेल्या पदार्थांमध्ये या पदार्थाचा समावेश आहे. सर्दी किंवा खोकल्याच्या औषधात आढळणारा हा पदार्थ असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. तसंच युसूफच्या स्पष्टीकरणावर बीसीसीआयने समाधानही व्यक्त केलं होतं. त्यामुळे युसूफला टीम इंडियातून केवळ पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, युसूफचं निलंबन त्याच्या पथ्यावर पडल्याचं सांगण्यात येतं. डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतरही त्याचं २०१८ मध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यात खेळण्याचं स्वप्न मात्र भंग होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.