जळगावातील खंडेराव नगरातून अल्पवयीन मुलास फूस लावून पळविले

0

जळगाव 

खंडेराव नगरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे प्रकार  उघडकीला आला  आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव  शहरातील खंडेराव नगरात १४ वर्षीय मुलगा आपल्या आईवडिलांसह राहतो. २९ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलाल अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात अल्पवयीन मुलाचा शोध घेतला परंतू आढळून आला नाही.

याप्रकरणी पीडित मुलाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

————————————

Leave A Reply

Your email address will not be published.