यावल येथे संकल्प करिअर अकॅडमीतर्फे सामान्य ज्ञान सराव परिक्षेचे आयोजन

0

यावल (प्रतिनिधी )

विरावली.छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन संचलित संकल्प करिअर अकॅडमी यावल येथे आज जनरल नॉलेज  सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत  सुमारे 150 विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला. तसेच  कार्यक्रमावेळी  बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला  प्रमुख म्हणून आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी व छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील,  कोरवापलीचे सरपंच विलास अडकमोल यांच्या  उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.

कार्यक्रमात उपस्थिती दिल्याबद्दल करिअर अकॅडमीचे संचालक बादल तायडे व सावन तायडे यांनी आभार मानले . बक्षीस वितरणा पूर्वी  कार्यक्रमात ऍड देवकांत पाटील व धनंजय चौधरी यांनी  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करून करिअर अकॅडमीला मदतीसाठी नेहमी तत्पर राहू अशी हमी देत संचालक बादल तायडे (राष्ट्रीय खेडाडू ) मुंबई पोलीस यांचे या अभिनव उपक्रमाचे कौतुक  करत अल्प अशा फीज मध्ये राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संचालक बादल तायडे,  सावन तायडे यांनी   परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.