जळगावहून पुणे, इंदूर विमानसेवा लवकरच; खा.उन्मेष पाटलांनी घेतली विमान उड्डाण मंत्र्यांची भेट

0

जळगाव  । जळगाव विमानतळावरुन पुणे, इंदूर विमानसेवा सुरू करण्याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी गुरुवारी दिल्लीत नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर जळगावहून पुणे व इंदूर येथे विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. या बैठकीला भारतीय विमान प्राधिकरण सहसचिव उषा पाडी, नियोजन सदस्य अनिल पाठक उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत पुरींनी नविन विमानसेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खुद पुरी यांनी याबाबत ट्विट देखील केले.

 

दरम्यान, जळगाव विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून सतराशे वरून चौपन्नशे मीटर केल्यास येथे मोठे प्रवाशी विमानसेवा सुरु होईल. तसेच नवीन टर्मिनल बिल्डिंगसह कार्गो टर्मिनल बिल्डिंग, विमानासाठी स्वतंत्र पार्किंग आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचना देखील केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री पुरी यांनी दिल्या आहेत.

 

अलीकडेच खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव विमानतळ येथे विमानतळ बांधकाम विभागीय अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक यांच्या समवेत सल्लागार समितीची बैठक घेतली होती. यात जळगाव-अंजिठा हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गुरुवारी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री पुरी यांची भेट घेऊन जळगाव ते पुणे व जळगाव ते इंदूर विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.