अमरावती येथे नागरिकांच्या मागणीप्रमाणे मिळत आहे कोरोना पॉझिटिव्हचे अहवाल

0

अमरावती (प्रतिनिधी) :  अमरावती येथे नागरिकांच्या मागणीप्रमाणे कोरोना चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल मिळत असून यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभेत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत . खुलासा करावा असे पत्र जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे , गेल्या काही दिवसांपूर्वीच चारशे रुग्णांचे सुमारे 4.5 कोटी रुपये एका विमा कंपनीने दिले असल्याचा गंभीर आरोप हि प्रकाश साबळे यांनी केला  असून . अशा अनेक कंपन्या  बोगस लाभ मिळवून देत असल्याचे प्रकाश साबळे यांनी पत्रात म्हटले आहे . अमरावती जिल्ह्यात काही लॅबमध्ये नागरिकांच्या खास करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरता कोविड चाचणीचे पॉझिटिव अहवाल देण्यात येत असून . त्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत उपस्थित केला होता , तसेच या संदर्भात चौकशी करण्याची मागणी ही त्यांनी केली होती . या मागणीवरून जि.प. अध्यक्षांनी चौकशी करण्याकरता जिल्हा टास्क फोर्स ची समिती तयार केली होती .

या  टास्क फोर्सने प्रकाश साबळे यांना दस्तऐवज व पुरावे सादर करण्याचे कळविले असता . त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून याविषयी निगडीत सर्व पुरावे आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे . त्यांनी काही मुद्द्यांवर टास्क फोर्स चे लक्ष वेधले आहे .त्यामध्ये कोरोणा संसर्ग झालेल्या जिल्हा परिषद , महापालिका , महसूल व इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात यावी .  कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी कोणत्या दवाखान्यात उपचार घेतले , किती कालावधीसाठी ते भरती होते . याची इत्यंभूत माहिती द्यावी  . सदर रुग्णालयांनी आकारलेली आंतररुग्ण देयके, औषधांची देयके , त्याचप्रमाणे आरोग्य विमा असल्यास उपचार कॅशलेस पद्धतीने करण्यात आला की उपचार झाल्यावर दे कांचा परतावा मिळाला  असल्यास त्या ईन्शुरन्स कंपनीचे नाव याची माहिती  सर्व कोविड पॉझिटिव झालेली असेल तर वैज्ञानिक दृष्ट्या मान्य अशी अँटीबॉडी टेस्ट करून त्याचे रिपोर्ट प्राप्त करून घ्यावे . जर ते खरेच पॉझिटिव्ह झालेले असतील तर त्यांच्या रक्तामध्ये कोविड चा प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडी निर्माण झाल्याचे सत्यापन होईल.

हे विषय चव्हाट्यावर आल्यावर आरोग्य विमा  पुरविणाऱ्या आघाडीच्या एका कर्मचारी अधिकारि वर्गा द्वारे याबाबत आधीच सज्ञान  घेतली असून  . याबाबत ते चौकशी करीत असून. आतापर्यंत 400 रुग्णांचे  4.5 कोटी रुपयाची  देयके  अमरावती येथे दिल्याचे व गेल्या काही दिवसातील  70 ते 80 क्लेम अध्याप प्रक्रियेत असल्याची माहिती मिळाली आहे . ही माहिती फक्त एका कंपनीची असून . अशा सेवा पुरविणाऱ्या इतर 10 ते12  विमा कंपन्यांची सुद्धा हीच परिस्थिती असल्याचे प्रकाश साबळे यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींचा टास्क फोर्सने जर अभ्यास केला . तर या विषयाची तड लागेल . अन्यथा वरवर जुजबी चौकशी करून काहीही साध्य होणार नाही . त्यामुळे वरील सर्व मुद्द्यांची माहिती उपलब्ध करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. असे पत्र प्रकाश साबळे यांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे . या पत्रामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून या मुद्द्यावर सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.