जळगावमध्ये कारने आलेल्या चोरट्यांनी फाेडले तीन मेडिकल

0

जळगाव | शहरातील आकाशवाणी ते इच्छादेवी चौकादरम्यान समंातर रस्त्यावरील तीन रुग्णालयांचे मेडिकल तवेरा कारने आलेल्या चोरट्यांनी फोडले. एका रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक ड्यूटी सोडून आतल्या खोलीत झोपल्याचा चोरट्यांनी फायदा घेतला. तर एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याने चाेरटे पळून गेले. रविवारी पहाटे ४.३० वाजता अवघ्या २० ते २५ मिनिटांच्या आत या तीन घटना घडल्या. कारसह चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत.

आकाशवाणी चौकात महामार्गावरील अॅपेक्स हॉस्पिटलमधील अॅपेक्स मेडीकलजवळ पहाटे ४.३५ वाजेच्या सुमारास तवेरा कार उभी राहिली. त्यातून तीन चोरटे बाहेर पडले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.