जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भडगावच्या विकासासाठी दिले निवेदन !

0

भडगाव, दि. २५ –

गीरणा नदीवरील बलून बंधारे लवकर व्हावेत, भडगाव गिरणा पाटबंधारे वसाहत मधील कर्मचारी निवास्थान व त्यातील रस्ते, गटारी दुरुस्ती, नगरपरिषद पाणीपुरवठा बंधारा, गिरणाकाठच्या स्वामी समर्थ केंद्राला संरक्षण भिंत, यशवंनगर, कराब व वडधे आदी भागातील सिटीसर्वेचा प्रश्न मार्गी लागावा इत्यादी मागणीसाठी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटील व भडगाव तालुका भाजपचे अध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी जलसंपदा व वैद्य कीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची दिनांक २३ रोजी मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन आदी मागण्या संदर्भात निवेदन दिले. यावेळी आदर्श कन्या शाळेचे अध्यक्ष दिपक महाजन व मानद सचीव एकनाथ महाजन उपस्थित होते.
बलून बंधाऱ्यांना ८/१० दिवसात प्रशासकीय मान्यता मिळून, लवकरच बलूनचा प्रश्न मार्गी लागेल असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलून दाखवलं. तसेच पाटबंधारे विभागाच्या वसाहत मधील शासकीय विश्राम गृह, अधिकारी व कर्मचारी कार्यालय, कर्मचारी निवास्थान, या भागातील रस्ते, गटारी जीर्ण झालेली आहेत. ते नव्याने किंवा दुरुस्ती करणे. शहराला महत्वाचा असणारा

पाणीपुरवठा करण्यासाठी कच्या बंधाऱ्याच्या जागी पक्का बंधारा व्हावा, यासाठी भाजप नगरसेवक अमोल पाटील यांनी अनेकदा पाठपुरावा करून मागणी केली आहे. त्या कामाला लवकरच निधी उपलब्ध करून द्यावा. आदर्श कन्या शाळेचे अध्यक्ष दिपक महाजन व मानद सचीव एकनाथ महाजन यांनी शाळेसाठी संरक्षण भिंतिची मागणी केली आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. गिरणाकाठच्या स्वामी समर्थ केंद्राला संरक्षण भिंत उभारून मिळावी. टोणगाव मधील यशवंत नगर, कराब, वडधे येथील भागात सिटीसर्वे झाला नसल्याने बहुतांश भाग भोगवट्यात आहे. सर्व नागरिक पालिकेला कर भरत असतांनाही त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना यासह शासकीय योजनांचा लाभ येथील नागरिकांना घेता येत नाही. शिवाय कर्ज मिळणे, घर बांधणे, विकणे आदी व्यवहारात प्रचंड अडचणी येत आहे. येथील भागाला विशे

ष बाब म्हणून सरसगट सिटीसर्वेत समावेश करावा, अशी मागणी सातत्याने नगरसेवक अमोल पाटील व भाजपच्या तालुका उपाध्यक्षा छायाबाई पाटील यांनी केली आहे. त्यासाठी मंत्रालयात पाठपुुराव सुरू आहे. यासर्व मागण्यासाठी भाजपचे तालुुुुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, तालुका समन्वव व पुणर्विलोकन समिती अध्यक्ष डाॅ संजीव पाटील याांनी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले असून हे विषय तात्काळ मंजूर करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाने केेेेली आहे . त्यावर संंमती दर्शवत मंत्री महाजन यांनी या कामांना लवकरच मंजुरी देणार असल्याचेेे आश्वासीत केल्याचे सोमनाथ पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.