जबरदस्त ऑफर ! 4 लाखांची कार 2.15 लाखात खरेदी करा

0

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

 

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

 

4 लाखांची कार 2.15 लाखात

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या Alto 800 LXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही सेकेंड हँड कार www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर 2.15 लाख रुपयांमध्ये विकली जात आहे. या कारची ऑन रोड किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कंपनीची टॉप सेलिंग कार आहे.

 

2015 चं पेट्रोल मॉडल

ही Maruti Suzuki Alto 800 LXI कार 2015 चं मॉडल आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार 69,627 KM इतकी धावली आहे. ही एक फर्स्ट ओनर कार असून यामध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

 

ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कार

ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कार आहे आणि वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार मारुती सुझुकीच्या ओरिजनल पार्ट्सचा वापर करुन रिफर्बिश्ड करण्यात आली आहे. ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी आणि तीन फ्री सर्व्हिस सुविधादेखील मिळतील.

 

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-new-delhi-2015/AXe6Pm4ZZPsTbFxud9WI) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

 

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.