खामगाव कृउबा समितीमध्ये ७५ लाखाचा भ्रष्टाचार ; चौकशीसाठी सभापतीसह सचिवांना जिल्हा उपनिबंधकांनी बजावली नोटीस

0

खामगांव:- आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या  खामगांव कृ.उ.बा.स.चे तत्कालीन सभापती संतोष टाले, बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे व बेकायदेशीर ठरावांच्या बाजूने असलेले तत्कालीन संचालक, अशोक हटकर,विठठ्ल लोखंडकार व दिलीप टिकार (पाटील) यांनी संगनमताने खोटे दस्तवेज तयार करुन बेकायदेशीर ठराव घेउन लाॅकडाऊन काळात अंदाजे 75 लक्ष रुपयांचा बेकायदेशीर खर्च करुन भ्रष्टचार केला होता. त्याविरुध्द काॅंग्रेसचे तत्कालीन संचालक श्रीकुष्ण टिकार  व जिल्हा युवक काॅंग्रेसचे महासचिव तुशार चंदेल यांनी मा.जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्यासह वरीश्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.

 

त्या तक्रारीच्या वैधानिक चैकशी अहवालानंतर मा.जिल्हा उपनिबंधक डाॅ.महेंद्र चव्हाण यांनी  अंदाजे 75 लक्ष रुपयांचा बेकायदेशीर खर्च केल्याप्रकरणी खामगांव कृ.उ.बा.स.चे तत्कालीन सभापती संतोष टाले,सचिव मुकूटराव भिसे व बेकायदेशीर ठरावांच्या बाजून असलेल्या संचालकांना कलम 117(4) नुसार नोटीस बजावली असून चैकशीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात समक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. मा.जिल्हा उपनिबंधक यांच्या या आदेशामुळे खामगांव कृशी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,खामगांव कृशी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती संतोष टाले,सचिव व ठरावांच्या बाजुने असलेल्या संचालकांनी कोरोना काळात मा.प्रधान सचिव पणन यांच्या पत्राचा दुरुपयोग करुन   कोणत्याही सक्षम सभेची मान्यता न घेता,कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता तसेच निवीदा प्रक्रिया न करता सर्व नियम धाब्यावर बसवुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या षिर्शकाखाली 9.96 लक्ष रुपये, भोजन पाकीट वाटपासाठी 16 लक्ष रुपये, जिवनाष्यक वस्तुंचे किट वाटपासाठी अंदाजे 34 लक्ष रुपये यासह इतर बाबींवर अंदाजे 75 लक्ष रुपयांचा खर्च केलेला आहे.

 

या विरुध्द तत्कालीन संचालक श्रीकुष्ण टिकार व युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुशार चंदेल यांनी मा.जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्यासह वरीष्टठाकडे तक्रारी केल्यानंतर मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा डाॅ.महेंद्र चव्हाण यांनी त्या तक्रारीची दखल घेत  महाराश्ट कृशी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 चे कलम 40 (ब) अन्वये चैकषी करण्याचे आदेश काढून चैकशी समितीमध्ये श्री बी.एन.कोल्हे सहायक निबंधक सहकारी संस्था,शेगांव व श्री.एम.एम.व्यवहारे सहकार अधिकारी श्रेणी 1 अधिन सहायक निबंधक सहकारी संस्था षेगांव यांची चैकषी अधिकारी म्हणून नेमणुक केली होती.चैकशी अधिकारी यांनी प्रकरणाची चैकशी करुन  तत्कालीन सभापती, सचिव व ठरावाच्या बाजुने असलेल्या संचालकांना दोशी धरुन चैकशी अहवाल मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला आहे.

त्या अहवालावरुन मा.जिल्हा उपनिबंधक यांनी काढलेल्या आदेशात असे नमूद आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने केलेल्या उपाययोजना व राबविलेल्या योजनांबाबत चैकशी समितीने चैकशी केल्यानंतर तक्रार अर्जामध्ये तथ्य असल्याचे निदर्षनास आले आहे. वैधानिक स्वरुपाची चैकशी कायदेशीरपणे पुर्ण होणे आवष्यक असल्याची खात्री झाल्यावरुन चैकशी समितीने त्यांचा चैकशी अहवाल कार्यालयाकडे सादर केलेला असून त्यामध्ये चैकशी समितीने निरीक्षण नोंदविलेले आहे. या निरीक्षणामध्ये कृशी उत्पन्न बाजार समितीने घेतलेली सभा ही नियमित/ सर्वसामान्य संचालकांची नव्हती.त्यामुळे या सभेमध्ये सुध्दा बाजार समितीच्या आर्थिक धोरणांशी संबंधीत विशयांचे  निर्णय घेण्याचे अधिकार सभापतींना नाही. बाजार समिती आर्थिक दृश्टया सक्षम असली तरी आर्थिक खर्च हा कायद्यातील तरतुदी लक्षात घेउनच करणे क्रमप्राप्त आहे.   बाजार समितीचे तत्कालीन सभापती संतोष टाले यांनी दि.दि.28/03/2020,दि.11/04/2020 ,18/04/2020 ला सभा घेतल्या तसेच दि.24/07/2021 व  27/07/2020 रोजी सभा नियमांचा भंग करुन बेकायदेशीरपणे सर्वसाधारण तातडीची सभा घेतली. सभेतील बेकायदेशीर ठराव रदद् करण्याच्या मागणीसाठी तत्कालीन संचालक श्रीकुष्ण टिकार यांनी मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,अमरावती यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यावर मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,अमरावती यांनी दि.18/12/2020 रोजी उपरोक्त सर्व सभांमधील सभानियमांचा भंग करुन घेतलेल्या सभा व त्यामधील ठराव रदद्बातल केल्यामुळे या सभांमध्ये त्या अनुशंगाने घेतलेले ठराव, त्या अनुशंगाने केलेला खर्च बेकायदेशीर आहे हे स्पश्ट होते. 40(ब)च्या चैकशी अहवालात तक्रारकर्ता तुशार चंदेल व तक्रारदार इतर संचालकांनी केलेल्या तक्रारीतील बहुधा सर्व मुद्यांमध्ये तथ्य असुन सभापतींसह,सचिव व बेकायदेशीर ठरावांच्या बाजुने असलेले संचालक दोशी असल्याचा निश्कर्श काढला आहे. यावरुन सभापती,सचिव यांनी अंदाजे 75 लक्ष रुपयांचा बेकायदेशीर खर्च केला आहे हे स्पश्ट होते. म्हणून महाराष्ट कृशी उत्पन्न खरेदी विक्री विकास व नियमन 1967 चे नियम 117(4)अन्वये संबंधीत दोशींना बाजार समितीचे सदस्य म्हणून त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी दि.10/03/2021 रोजी मा.जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहुन जवाब सादर करावे अश्या प्रकारची नोटीस मा.जिल्हा उपनिबंधक यांनी दि.22/02/2021 रोजी बजावली आहे.

सभापती,सचिव व बेकायदेशीर ठरावाच्या बाजून असलेल्या संचालकांनी  शेतकयांच्या संस्थेत भ्रष्टचार  करुन बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले आहे. भ्रष्टाचाराध्दचे संपुर्ण दस्तवेज तक्रारकत्यानी चैकशी अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे.  तरी तत्कालीन सभापती, सचिव व बेकायदेशीर ठरावांच्या बाजुने असलेल्या संचालकांविरुध्द खोटे दस्तवेज तयार करुन शडयंत्र रचुन संगनमत करुन बाजार समितीच्या लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी व संबंधीत दोशींकडुन बेकायदेषीररित्या झालेला अंदाजे 75 लक्ष रुपयांचा खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी तक्रारकर्ता श्रीकुष्ण टिकार व तक्रारकर्ता तुशार चंदेल यांनी मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्यासह वरीष्ठाकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.