जन्मदाता बापच निघाला नराधम ; दारूच्या नशेत मुलीवर केला अत्याचार

0

 पारोळा (प्रतिनिधी) ; बापानेच पोटाच्या मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे घडली,

याबाबत अधिक असे कि तालुक्यातील कन्हेरे येथे आपल्या पोटाच्या सोळा वर्षीय मुलीवर सहा महिण्यापुर्वी घरातील सर्वजण बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत  दारूच्या नशेत आपल्या सोळा वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार केला, व मुलीस कोणाला जर सांगीतले तर मारून टाकेण व स्वता ही मरून जाईल अशी धमकी दिली, मागील काही महिण्यापासुन मुलीला त्रास जाणवत असल्याने तिला डाॅक्टरांकडे नेले असता तीच्या पोटात सहा महिण्याचे गर्भ असल्याचे समजले पिडितेच्या फिर्यादीवरून सदर बापाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास सहय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र बागुल हे करीत आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.