जगासमोर आणखी एका नव्या विषाणूचे संकट

0

मेलबर्न – कोंबड्यांमधील अपोकॅलिप्टिक व्हायरस कोरोनापेक्षाही भयंकर असून, तो पसरल्यास जगाची निम्मी लोकसंख्या संपेल, अशी भीती ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ मायकेल ग्रेगरी यांनी येथे व्यक्त केली.

ग्रेगरी म्हणाले, कोरोनाची अवघ्या जगाला झळ बसली आहे. आता आणखी एका नव्या विषाणूचा आपल्याला धोका आहे.अपोकॅलिप्टिक असे त्याचे नाव असून, तो अत्यंत धोकादायक आहे. सध्या या व्हायरसने कोंबड्यांमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून हा विषाणू वेगाने पसरू शकतो. तसे झाल्यास भयानक परिस्थिती निर्माण होईल. यातून आपण दुसऱ्या महामारीकडे वळू शकतो. ते टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगाने शाकाहाराकडे वळण्याचा सल्लाही ग्रेगरी यांनी दिला आहे.

याशिवाय आफ्रिकेतील कॉंगो देशात “इबोला’चे सहा रुग्ण आढळले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. एप्रिलमध्ये बेनी शहरात इबोलाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता इबोला पश्‍चिम शहरातल्या माबंडाकापर्यंतही पसरला आहे.

दोन शहरांमध्ये सुमारे 620 मैलांचे अंतर आहे. कॉंगोमधील इबोलाचा हा 11वा उद्रेक आहे. कॉंगोचे आरोग्यमंत्री इतेनी लॉंगोंडो म्हणाले की, माबाडाकामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आम्ही तेथे लवकरच लस आणि औषधे पाठवणार आहोत. कॉंगोच्या इक्वेतेर प्रांतात सन 2018 मध्ये इबोलाचा उद्रेक झाला आणि 54 घटना नोंदल्या गेल्या. त्यामधील 33 लोकांचा मृत्यू झाला. कॉंगोमध्ये दोन नवीन लस वापरल्यानंतरही आतापर्यंत 2260 लोकांचा इबोला विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.