चोपड्यातील रथ आणि वहनोत्सव कोविड मुळे स्थगित

0

चोपडा | प्रतिनिधि

चोपडा येथील श्री वेंकटेश बालाजी संस्थेतर्फे गेल्या तिनशे से साडे तिनशे वर्षा पासून ची वहनाची आणि रथ उत्सवाची परंपरा कोविड महामारी मुळे शासनांच्या निर्बधामुळे स्थगित करण्यात आली असुन यंदा ही बालाजी महाराज यांचा रथऊत्सव आणि वहनोत्सव रद्द करण्यात आला असे संस्थेचे विश्वस्त, अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी यांच्या सूचने नुसार प्रवीणभाई गुजराथी यांनी जाहीर केले.   यंदा चा रथ उत्सव जागेवर च रथाची सजावट, करुंन बालाजी महाराज यांची जागेवर विधीवत पूजा करुंन साजरा करण्यात आला.यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी, प्रवीणभाई गुजराथी,घनश्याम अग्रवाल,अशोक पाटील,आनंदराव देशमुख,युवराज महाजन,अवतार सिंग चौहान, पोलिस निरीक्षक,भूपेंद्र गुजराथी,यांच्या प्रमुख उपस्तिथितीत यंदा चा रथ उत्सव जागेवर च दर्शन घेवून साजरा करण्यात आला.

सुमारे तीन शे ते साडे तीनशे वर्षा च्या या वहन उत्सवाची ही अखंडित परंपरा कोविड मुळे स्थगित करण्यात आली,त्यामुळे आज पर्यंत जे यात्रेला खेडया पाड्याहूंन येणारे रात्रेकरु होते,त्यांच्यावर आणि लहान मोठे व्यावसायिकांवर विर्जन पडले.या यत्रेसाठी लांबुन लांबुन भावीक येत होते,नातेवाईकांच्या घरी मुक्काम करीत होते.त्यावेळी येण्याजाण्या साठी ईतर व्यवस्था, वाहने नव्हती म्हणून बैल गाड़ी घेवून लहान सहान लेकरां सोंबत आबालवृद्ध ही या यात्रेसाठी मोठ्या आनंदाने येत असत.

आशा टॉकीज आणि स्वस्तिक टॉकिज या दोंन चित्रपट गृहात सकाळी नऊ वाजेपासुन ते रात्रभर एखादा हिट चित्रपट हा दाखवला जात होता,लोकांना करमणूकीची चे साधन त्यावेळी नसल्याने चित्रपट गृह हे हाऊसफुल्ल चालत होते.गावात जिकडे तिकडे यात्रेसाठी आलेली गर्दी दिसत होती,सर्वत्र छोटे मोठे दुकानें, हॉटेल्स सजविलेले दिसत होते.खास करुंन गुळाची जिलेबी,भजी लोक आवर्जुन खात होते.बालाजी महाराज यांना केळी चा प्रसाद अर्पण करीत होते,म्हणून सर्वत्र केळी  विक्री होत होती.सर्वच लहान मोठे व्यवसाय जोरात चालत होते.वर्षातुन तालुक्यात होणारा एकमेव मोठा रथ उत्सव यात्रोत्सव हा फक्त आणि फक्त हा रथ उत्सव च असायचा.

      दिवसेंदिवस आधुनिक होत चाललेला सन उत्सव त्यातल्या त्यात कोविड मुळे गरीब व्यवसायीकांची होणारी उपासमार

दिवसेंदिवस सर्वच सन उत्सव हे बदलणाऱ्या काळात एक आठवण म्हणून च राहत असल्याचे चित्र दिसत आहे.डिजिटल युगात टीव्ही,केबल,मोबाईल,मुळे जग आधुनिक होत चालले आहे, पण ज्या गरीबांचा पोटा पाण्याचा प्रश्न हा परंपरेनुसार आणि छोट्या मोठ्या व्यावसायातून आहे म्हणजेच जसे की यात्रेत कुंभार लोक माठ,आणि माती पासून बनवलेली खेळणी महिन्या पासुन बनवून ठेवत होते,आणि संपूर्ण वर्षा चा उदरनिरवाह मग त्यावर चालवत होते,तसे च यात्रेत फुगे वाले,छोटे छोटे खेळणी विकण्या साठी दुरून दुरून येणारे लोक,हलवाई,झूले,पाळणे,आणि कासार,बेलदार,आणि हातावर कपाळावर गोंधणाऱ्या ह्या व्यावसायीकांवर, वंशम परंपरागत आपला व्यवसाय यात्रेत करुन आपला प्रपंच भागवत होते,यांचे आता काय्य?हा विचार कोणीही करीत नाही. राजकीय सभा लग्नकार्य,ईतर विधी सुरु आहेत,त्यांना कोणतीही बंदी नाही.पण यात्रा,थिएटर,नाट्य मंदिर,यापासुन ज्यांच्या पोटाची खळगी भरते,उदरनिरवाह चालतो तेच नेमके बंद आहे,तर गरीबांची उपासमार थांबेल कशी?हा विचार कोणीही करीत नाही.  म्हणून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने सर्वच जग त्रासले आहे,गरीबांची उपासमार होताना दिसते आहे.नाहीतर यात्रा सन उत्सवात सर्वच लोकांना हाताला काम मिळते. रोजगार मिळतो,लोक आनंदी असतात.   अश्य्या या बालाजी महाराज यांच्या कोरोनात स्थगिति आलेल्या रथ वहन उत्सवाची ख़ुप मोठी परंपरा आहे,सुमारे तिनशे ते साडे तिनशे वर्षा ची परंपरा यंदा कोविड मुळे स्थगित झाल्याचे चित्र इतिहासात पहिल्यांदा च बघायला मिळाल.

Leave A Reply

Your email address will not be published.