चोपडा येथे पेंशन योजनेविरूद्ध आशा गटप्रवर्तकांचा एल्गार!

0

चोपडा,दि. 4-
केंद्र सरकारने आशा अंगणवाडी गटप्रवर्तक यांचे 18ते 40 वयोगटातील कर्मचारींना प्रधानमंत्री श्रमयोगी सैवानिवृती मानधन पेंशन योजना जाहीर केली आहे. याच्या विरोधात आशा गटप्रवर्तक संघटना तर्फे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते कॉ अमृतराव महाजन आदींचे नेतृत्वाखाली चोपडा तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
ज्यांना नजिकचे कालात सेवानिवृती मिळणार आहे अशा लाखो महिला कर्मचारी यांना वगळले ने त्यांचे त अअसंतोष निर्माण झाला आहे त्या विरूद्ध व गटप्रवर्तक यांना 21 हजार रुपये तर आशांना 18 हजार रूपये पगार मिळावा गणवेशासाठी दीड हजार रुपये मोबाईल रिचार्ज साठी पाचशे-रूपये दरमहा कागद खर्चासाठी दोनशे रूपये मिळाले पाहिजेत औषधीची कीट मिळावी, प्रवासाचे भाडे मिळावे आदी तीस मागण्यांठी आशा गटप्रवर्तक संघटना तर्फे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कामगार नेते कॉ अमृतराव महाजन ,संघटनेचे चे राज्य समिती सदस्य शैला परदेशी , मीनाक्षी सोनवणे, मनिषा पाटील रेखा पाटील,रत्ना बाविस्कर ,रंजना सांगोरे, शालीनी सोनवणे ,वंदना सोनार, ललिता मोरे ,शोभाबाई साळुंखे ,साक्षी पाटील शकूतला पवार आनिता भालेराव, भारती पाटील ,आदींचे नेतृत्वाखाली चोपडा तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
नायब तहसीलदार महेश साळुंखे यांना निवेदन देणेत आले निवेदनात म्हटले आहे की सरकारने जाहीर केलेल्या या पेंशन योजनेत सर्व वयोगटातील महिला कामगारांना समाविष्ट केले पाहिजे म्हणून येत्या 5 मार्च रोजी जळगाव जिल्हा परिषद समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालूक्यातील सर्व आशा गटप्रवर्तक यांनी सहभागी होणार आहेत.. असा ईशाराही देण्यात आला आहेत या आंदोलनात तालूक्यातील सर्व गटप्रवर्तक व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आशा आवर्जून उपस्थित होते .या आंदोलनात चहार्डी येथील ग्रा पं कर्मचारी 20 महिन्यांचे थकित पगार व 41महिन्यांच्या प्रा फंड रकमेच्या मागणी आजपासून बेमूदत संपावर उतरलेने त्यांचेही गार्हाणं तहसीलदार यांच्याकडे मांडण्यात आले. रमेश खैरनार, संजय पाटील ,शिला चावरे, आदी 13 कर्मचारीही धरणे आंदोलनात सहभागी झाले होते .त्यांनीही निवेदनात म्हटले आहे की ,कर्मचारी चे थकित पगार प्रा फंड रक्कम अफरातफर प्रकरणी जबाबदार चहार्डी ग्राम पंचायत बरखास्त करावी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करावे, 14व्या वित्त आयोगाचे रक्कमेतून पगार करावेत त्यांचे अनूदान थांबवावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत .येत्या 6 मार्च पासून पंचायत समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.