एकलव्य जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा

0

जळगाव दि. 4- एकलव्य जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून तंट्या भिल मित्र मंडळ, एकलव्य आदिवासी क्रांतीदल आदींकडून सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी एकलव्य आदिवासी क्रांतीदलाचे अध्यक्ष अरुण मोरे आदी उपस्थित होते.
सदर शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघून नेहरु चौक, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक मार्गे तंट्या भिल सोसायटीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत एकलव्याचे गुरु द्रौणाचार्य यांची आरास साकारण्यात आली होती.
भिलाऊ गितांवर पारंपारीक ठेका
शहरातील विविध चौकात लाल बा मना मन रमना, पावरी धुन आदीवर आदिवासी बांधवांनी पारंपारीक ठेका धरत नृत्य सादर केले. यावेळी महिलांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.