चीनमध्ये सापडला आणखी एक व्हायरस ; जगभरात खळबळ

0

बीजिंग: करोना व्हायरसचे जगभरात थैमान सुरु असतानाच चीनमध्ये आणखी एक व्हायरस सापडला आहे. कोरोनासारखाच आणखी एक विषाणू शास्त्रज्ञांना चीनमध्ये सापडला आहे. डुकरांपासून माणसांना होणारा G4 EA H1N1 हा आजार वेगानं संसर्ग पसरत असल्याचंही चीनच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.हा संसर्ग जगभरात पसरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संशोधकांनी हा विषाणू G4 EA H1N1 असल्याचे म्हटले आहे. हा विषाणू सहजपणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये फैलावू शकतो. यामुळे आजाराची महासाथ येण्याचा धोका आहे. त्यामुळे संशोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मानवाला बाधित करण्यासाठी तापाच्या या विषाणूमध्ये सर्वच प्रकारची लक्षणे आहेत. या विषाणूववर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. विषाणू नवीन असल्यामुळे मानवात याचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती कमी असण्याचीही शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.
करोनाचे थैमान अद्याप संपले नसताना आणखी एका घातक विषाणूचा शोध समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरात २००९ मध्ये स्वाइन फ्लू ही तापाची शेवटची साथ आली होती. स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी वयस्करांमध्येही पुरेशी रोगप्रतिकार शक्ती होती. हा A/H1N1pdm09विषाणू आता दरवर्षी देण्यात येणाऱ्या तापाच्या लसीमध्ये येतो. चीनमध्ये आढळलेला विषाणू हा स्वाइन फ्लूसारखाच आहे. मात्र, त्यात बदल दिसून आले आहेत. या विषाणूचा सध्या तरी काही धोका नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.