चिंताजनक! मुंबईत पाच हजारांपेक्षा अधिक जण ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये – राजेश टोपे

0

मुंबई : दिवेसंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यातही सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत वाढले आहेत. दरम्यान, मुंबईच्या चिंतेत आणखी वाढ करणारी बाब समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. तर मुंबईतील तब्बल ५ हजारापेक्षा अधिक लोक १६२ रुग्णांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये असल्याची चिंताजनक माहिती टोपे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडल्यांनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी सरकार प्रयन्त करत असून. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.