जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 895 उज्वला लाभार्थींच्या खात्यात तीन महिन्यांची अग्रिम रक्कम जमा होणार

0

जळगाव :– कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. या कालावधीत नागरीकांची कोणतीही अडचण निर्माण होवू नये. याकरीता केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने  एप्रिल ते जून, 2020 या कालावधीत सर्व उज्ज्वला ग्राहकांसाठी कोविड-19 च्या कालावधीत विनामूल्य एलपीजी गॅस देण्याचे जाहिर केले आहे. ही देय रक्कम  उज्ज्वला लाभार्थींच्या रिफिलच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाणार आहे. या योजनेचा लाभ जळगाव जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 895 लाभार्थ्यांना होणार आहे.

जागतीक आरोग्य संघटनेद्वारे कोरोना विषाणू (कोविड-19 ) या आजाराला महामारी असे घोषित केले आहे. एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा मुकाबला करण्यासाठी शासन विविध लोकोपयोगी उपाययोजना अंमलात आणत आहेत. तथापि, आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकोन शासनाने दिलेले निर्देश पाळणे आपले कर्तव्य समजले पाहिजे.

भारतातील विविध गॅस वितरण कंपन्यांच्या माध्यमातून देशात जवळपास 32 कोटी घरांमध्ये गॅसचे वितरण केले जाते. सध्या भेडसावत असलेल्या कोरोना व्हायरमुळे गॅस ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी गॅसचे बुकींग व रक्कम देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा वापर करावा. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना जून 2020 पर्यंत गॅसचे देयकाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात अग्रिम स्वरूपात (Advance) जमा करण्यात येणार आहे. असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे डीएनओ  स्वप्नील श्रीवास्तव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.