चाळीसगाव तालुक्यातील गुजरदरी गावात चाळीसगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुजरदरी गावात रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम -३० औषधी वाटप

0

शिवनेरी फाउंडेशन च्या सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण गावात आल्याने गुजरदरी येथील गावकरी भारावले

चाळीसगाव (प्रतिनीधी) :  मिशन बिगीन अगेन म्हणत शासन हळूहळू लॉकडाऊन उठवत परिस्थिती पूर्वपदावर आणत असताना मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षाचे गणित ठरविणाऱ्या खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतशिवारात कामांची लगबग सुरू झाली आहे.

अन्नदात्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी घराबाहेर निघाल्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरीकडे मात्र या ना त्या मार्गाने कोरोना होण्याची भीती आहे अश्या वेळी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत येणाऱ्या परिस्थितीला तोंड देणे हाच पर्याय असल्याने चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटूंबाना केंद्र शासनाच्या आयुष् मंत्रालयाने सुचविलेले आर्सेनिक अल्बम -३० हे औषध घरपोच वाटप करण्यात येईल असा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक हात मागील १५ दिवसांपासून राबत आहेत त्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांचा पुढाकार महत्वाचा आहे.
आणि अखेर १ लाख आर्सेनिक अल्बम औषधी वाटप सुरुवात झाल्यानंतर ते औषध चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या घरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे ही खरी परीक्षा होती. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते जिल्हा परिषद गट निहाय प्रत्येक गावात औषधी किट पोहोचवत होते. मात्र चाळीसगाव शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर व डोंगर दऱ्यात वसलेले शेवटच्या टोकावरील गुजरदरी या गावात जाण्याचा निर्णय सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी घेतला, आज दि.८ जून रोजी त्यांनी सदर गुजरदरी गावात आर्सेनिक अल्बम – ३० औषध पोहोच केले.
तालुक्याच्या आमदारांच्या पत्नी आपल्यासाठी गावात आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. गावातील आशा सेविका व स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांना औषधी किट सुपूर्द केले. आमदारांच्या पत्नी प्रथमच आपल्या गावात आल्या म्हणून गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या शेतातील गावराणी आंब्याच्या कैऱ्या भेट म्हणून त्यांना दिल्या. निवडणुकीत मत मागायला देखील राजकारणी आमच्या गावात येत नाहीत मात्र तुम्ही कोरोनाच्या संकटात आमच्यासाठी औषधी घेऊन आलात म्हणून ग्रामस्थांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले. सौ.प्रतिभाताई चव्हाण देखील गावकऱ्यांनी केलेल्या स्वागतामूळे व आगळीवेगळी मिळालेली भेट पाहून भारावून गेल्या.
केवळ मतांपुरते नाही तर कायमचे ऋणानुबंध गुजरदरी गावाशी जोडले गेल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी सौ.भाग्यश्री घोंगडे, सागर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन औषधी वाटप

खरिपाचा हंगाम सुरू असल्याने खेडोपाडी शेती तयार करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग शेतात जात असल्याने सौ.प्रतिभाताई चव्हाण या गुजरदरी हुन चाळीसगाव येथे परतत असताना त्यांनी हिरापूर येथील जगदीश गंभीर निकुंभ यांच्या शेतात भेट दिली. शेतात महिलावर्ग धस काढत असताना सौ.प्रतिभाताई यांनी त्यांची विचारपूस करत त्यांना औषधी दिली. त्यानंतर तांबोळे बु./खु., चितेगाव येथे देखील आर्सेनिक अल्बम औषधी किट ग्रामपंचायत सरपंच, आशा सेविका यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, निवृत्ती कवडे, भूषण पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.