पारोळा येथे पाच दुकानदारावर कारवाई

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील संपूर्ण बाजार पेठ ही प्रतिबंधीत क्षेत्र मध्ये असल्या नंतर ही बाजार पेठेतील काही दुकाने सुरु असल्याने प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन केल्या प्रकरणी बाजार पेठेतील पाच दुकानदारांवर कलम १८८ प्रमाणे पोलिस व नगरपालिकेच्या पथकाने संयुक्त कारवाई केल्याने व्यापाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. पारोळा येथील ओतार गल्लीतील ५७ वर्षीय इसम हा मागील पंधरा दिवसापुर्वी कोरोना बाधित आढळला होता. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ ही प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास पुर्ण पणे बंदी घालण्यात आली असतांनाही काही दुकानदार आपले दुकाने उघडुन व्यवसाय करित असल्याचे आढळून आल्याने दिनांक ८ रोजी पोलिस उप निरीक्षक यांच्या सह नगरपालिका प्रशासनाने या दुकानदारावर कलम १८८अन्वे, कारवाई केली आहे, यात किराणा दुकान, स्टेशनरी दुकान, टेलर काम, आॅनलाईन भरणा केंद्रासह हातगाडीवर कपबश्या विक्री करणाऱ्याचा समावेश आहे.

किती दिवस उपाशी राहायचे ; व्यापारी व व्यवसायीक

येथील स्थानिक प्रशासनाने आज पाच दुकानावर कारवाई चा बडगा उगारला या वेळी काही व्यापारी तसेच व्यवसायीक यांनी आपली व्यथा मांडीत सांगितले की शेवटी किती दिवस उपाशी राहायचे, तर अनेक व्यवसायीकांचे धनादेश ही बाऊंस होत असल्याने अनेक व्यापारी मेटाकुटीला आले आहेत.

शहरात बाजारपेठ सोडली तर इतर कुठलाही उधोग नाही आणि ही बाजारपेठच जर मागील ८० दिवसांपासून बंद आहे तर आम्ही करायचे तरी काय शेवटी हे किती दिवस चालणार आहे. आम्ही ही कामगारांना किती दिवस घरी बसुन पगार द्यायचा,सरकारने आमचाही विचार करवा प्रतिबंधीत क्षेत्राची व्याप्ती कमी करून या क्षेत्राची लांबी रूंदी कमी करून बाजारपेठे तील काही दुकाने तरी उघडावी जेणेकरून लहान मोठे व्यवसायीक व व्यापारी हे आपला उदरनिर्वाह करू शकतील कोरोना च्या भीतीने नंतर पंरतु उपासमारीनेच व्यापारी व व्यवसायीक मरतील अशी भीती आता व्यापारी व्यवसायीक व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.