एरंडोल पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

0

एरंडोल (प्रतिनिधी);- येथील पंचायत समिती कार्यालयातील ५० वर्षीय कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
सदर कर्मचारी हे आसोदा तालुका जळगाव येथील रहिवासी असून तेथून ते ये- जा करतात.२८ मे २० रोजी ते पंचायत समिती कार्यालयात आले होते. २६ मे रोजी. यावल तालुक्यांत त्यांच्या सासू चे निधन झाले असता त्या ठिकाणी ते गेले होते तसेच २९ मे रोजी त्यांचा तरुण शालका चे निधन झाले मात्र त्याचा निगेटिव्ह अहवाल आला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून सदर कर्मचारी गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले कार्यालयातील तीन ते चार कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले जातील असे सांगण्यात आले.

दरम्यान नगरपालिका कर्मचार्‍यांनी आधी पंचायत समिती कार्यालयाला सील केले. मात्र प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या सूचनेवरून पुन्हा सील काढण्यात आले व सदर कोरूना बाधित ज्या विभागात कार्यरत आहेत त्या लेखा विभागाला सील करण्यात आले. तसेच एरंडोल पंचायत समितीचे आवार व कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना ची धडक शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचल्याची ही पहिलीच वेळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.