चारित्र्यावर संशय व मानसिक छळ प्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

0

बोदवड (प्रतिनिधी) :-  मानसिक छळ व चारित्र्यावर संशय व लग्नात मानपान दिला नाही म्हणुन महिलेला मानसिक छळ व शारिरीक छळ देत असल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात पती,सासरे,सासू,ननंद,जेठ याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, अकोला जिल्ह्यातील उमरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे राहत असलेल्या विवाहित महिला नालंदा सचिन दांडगे यांना त्यांचे पती सचिन यशवंत दांडगे,सासरे यशवंत रुपाजी दांडगे,सासू सुनंदा यशवंत दांडगे, ननंद सारिका यशवंत दांडगे,व जेठ मिथुन यशवंत दांडगे,व ननंद सुषमा अनिल वाघ यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसांत चारित्र्यावर संशय घेणे,लग्नात मानपान दिला नाही,हुंडा कमी दिला या कारणावरून कुरापती काढत शिवीगाळ करून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याच्या कलमान्वये भा.दं.वी.कलम ४९८,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गजानन काळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.