मराठी’ सक्तीच्या निर्णयाचे जळगावात मनविसेतर्फे जल्लोषात स्वागत

0

जळगाव प्रतिनिधी । राज्यातल्या सर्व माध्यमांच्या व सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचे विधेयक ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पुर्वसंध्येला ठाकरे सरकारने एकमताने मंजूर केल्याने महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे निर्णयाचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राज्यातल्या सर्व माध्यमांच्या व सर्व मंडळांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचे विधेयक मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला उध्दव ठाकरे यांच्या सरकारने विधान परिषदेत एकमताने मंजूर केले. कायद्याची अंमलबजावणी न करणार्‍या शाळांना एक लाख रुपये दंड तसेच शाळांची मान्यता काढून घेण्याची तरतूद कायद्यात आहे. २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होईल, यावर एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर २७ फेबु्रवारी गुरुवारी मराठी भाषा दिनापासून याची अंमलबजावणी सुरु झाल्याने जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे या निर्णयाचे जळगाव शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

राज्य सरकारने मराठी भाषेला शाळेमध्ये ही सक्तीचे केल्याने महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही झाला आहे. याबद्दल शहरातील कोर्ट चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या निर्णयाचे फटाके फोडून व नागरीकांना पेढे भरवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, मनसे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे, संदीप महाले, चेतन पाटील, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, पंकज चौधरी, कुणाल पाटील, दुर्गेश सन्यास, आशुतोष ब्राम्हणे, अतुल पाटील, आतिष बारसे यांच्यासह मनसे, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.