चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक पघटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. गावातील गणेश भागवत मोहिते याने ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश मोहितेने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले.

घराच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय ३२) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.